श्री.दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ. सर्जेपुरा,अहिल्यानगर प्रस्तुत हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाची आजपासून होणार सुरुवात.
नगर,प्रतिनिधी.(24.फेब्रुवारी. 2025.) : श्री.दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ. सर्जेपुरा,अहिल्यानगर प्रस्तुत हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाची आजपासून नगर शहरातील विविध भागात सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या 30 वर्षांपासून दरवर्षी नित्यनियमाने भाविक भक्तांसाठी घेण्यात येतो.
हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमात हनुमान चालीसाचे पाच पाठ, हनुमान अष्टक,राम स्तुति,गणपती भजन, सर्व देव - देवतांची भक्तीगीते, देवीचे भजन घेऊन शेवटी हनुमानाची आरती करण्यात येते. संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आयोजकांकडून उपस्थित भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येते.या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
यावर्षी हनुमान चालीसा पाठ व भजन संध्याचा कार्यक्रम सोमवार 24 फेब्रुवारी 2025 ते 14 एप्रिल 2025 असे 50 दिवस संध्याकाळी 07:00 ते 10:00 या वेळेत होणार आहे. आयोजकांच्या आग्रहाखातर यावर्षी 10 दिवस जास्त कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री.दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ यांच्याकडून देण्यात आली.