पालकांनी मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे गरजेचे. - आमदार संग्राम जगताप.
किड्स सेकंड होम स्कुल चे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न..
नगर,प्रतिनिधी.(10.फेब्रुवारी. 2025.) : प. पु. माताजी श्री. निर्मलादेवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन आदेश लॉन, बोल्हेगाव येथे पार पडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संपत बारस्कर, मा. शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, मा. नगरसेवक दत्ता कावरे, सौ. वीणाताई बोज्जा, जेष्ठ सहजयोगी बाळासाहेब बिरसदार संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले, संचालक संदीप ठोंबरे व कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. संग्राम जगताप म्हणाले आज शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, संगीत व क्रीडा चे शिक्षण देणे काळाची गरज आहे. पाश्चात्य देशात शिक्षणा बरोबरच विद्यार्थी यांचे कला कौशल्य मापन करून शिक्षण दिले जाते त्या मुळे ते देश प्रगती पथावर आहेत, आपल्याकडे पाल्याचे आई वडील फक्त शिक्षणाकडेच लक्ष देतात परंतु शिक्षणा बरोबरच विदयार्थ्यांचे सुप्त कला गुणांना वाव देणे काळाची गरज आहे. जर मुलांचे सुप्त कला गुण कोणते आहेत हे कळाले व त्याला त्याच विषयांचे शिक्षण दिले तर नक्कीच तो आपले भविष्य उज्वल करेल. या वेळी सचिन जाधव, संपत बारस्कर व संभाजी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी संस्थे बाबत माहिती देतांना सांगितले की, संस्था लवकरच स्वमालकीच्या जागेचे नियोजन करीत आहे. आज रोजी शाळेत 250 पेक्षा जास्त विदयार्थी शिक्षण घेत असून विदयार्थ्यांना त्यांचे सुप्त कलागुणांना वाव मिळणेसाठी सर्वतो परी प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प. पु. माताजी श्री.निर्मला देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणेश वंदन करण्यात आलं . विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य केले, नाटक, संगीत असे अनेक कार्यक्रम पार पडले.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सौ अर्चना चव्हाण व आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु.साक्षी चव्हाण, अंश आढाव, ध्रुव साळवे, आरोही झुंबड, विराज रोडे, शिवण्या सुंबे, राऊत संस्कृती, शिरसाठ प्रीशा, ऋतुराज डेंगळे व रुद्रा कोकाटे या विद्यार्थ्यांना देण्यात आले. वर्षभरात झालेल्या विविध कार्यक्रमांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले . पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे यांनी केले तर डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपाली हजारे,सौ. सुचिता भावसार मॅडम व शाळेचे संगीत विभागाचे प्रमुख शुभम भालदंड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिन्सिपल उषा गरड, सौ .संगिता गांगर्डे, सहशिक्षक रूपाली जोशी, हिवारकर आरती, भाटे अर्चना विधाते रेणुका, गायकवाड अनिता आदींनी परिश्रम घेतले. डेकोरेशन आणि नियोजन डीएसपी इव्हेंट्स यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.शेवटी आलेल्या लोकांना प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेत कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम लातूर येथील जेष्ठ सहजयोगी बाळासाहेब बिरासदार यांनी घेतला. अनेकांना याची प्रचितीही आली यावेळी अनेक सहजयोगी उपस्थित होते.